28/03/2025

निवडणूक निर्णय अधिकारी / प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका 2024

ई प्रवर्गातील सहकारी संस्था म्हणजेच २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नामतालिकासाठी अर्ज सादर करणेबाबत

दिनांक :    /१२/२०२४

प्रति,
माननीय विभागीय सहनिबंधक,
सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई.

विषय : ई प्रवर्गातील सहकारी संस्था म्हणजेच  २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नामतालिकासाठी अर्ज सादर करणेबाबत ….

महोदय,

मी सहकार खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी, इतर शासकीय विभागातील / स्थानिक स्वराज्य संस्थेतील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी, सनदी/प्रमाणित लेखा परीक्षक / वकील असून आपणास याद्वारे विनंती करतो की आपल्या विभागातील २५० पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांची निवडणूक घेण्याची कार्यवाही पार पाडण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी / प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका तयार करण्याबाबतची जाहिरात प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे. त्यास अनुसरून मी सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी / प्राधिकृत अधिकारी म्हणून कामकाज करण्यास इच्छुक असून मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियम १९६१, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) (सुधारणा) नियम २०१९ व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या तरतुदी ज्ञात आहेत.

माझी वयक्तिक माहिती खालील प्रमाणे आहे.

अ. क्र.

विषय

तपशील

संपूर्ण नांव :  मराठी

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

 

संपूर्ण नांव :  इंग्रजी   

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

संपूर्ण पत्ता : निवास 

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

 

संपूर्ण पत्ता : कार्यालय

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

शैक्षणिक अहर्ता पात्रता

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

दूर ध्वनी / मोबाईल नंबर

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx 

मेल आयडी

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

निवृत्त असल्यास

१)      संस्थेचे / कार्यालयाचे नांव

२)     निवृत्तीचेवेळी धारण केलेले पद

३)     सेवा निवृत्तीचा दिनांक

लागू नाही / xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

वकील असल्यास बार कौन्सिलचे छायांकित प्रमाणपत्र

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

बार कौन्सिलचे छायांकित प्रमाणपत्र सोबत जोडले आहे.

प्रमाणित लेखापरीक्षक असल्यास पॅनल नंबर

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

अनुभव असल्यास अनुभवाच्या दाखल्याची मूळ प्रत जोडण्यात यावी.

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

१०

आधार कार्ड क्रमांक

xxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

मी वरील प्रमाणे सादर केलेली सर्व माहिती सत्य असून याबाबतचे विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सोबत जोडले आहे. निवडीचे कोणत्याही टप्यावर मी सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी किंवा बनावट असल्यास राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे निदर्शनास आल्यास त्याबाबत माझे विरुद्ध वैधानिक कारवाई होऊ शकते याची मला जाणीव आहे.

तरी माझ्या अर्जाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मला २५० पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणूकीचे निवडणूक निर्णय अधिकारी / प्राधिकृत अधिकारी म्हणून नामतालिकेत माझे नांव समाविस्ट करणेत यावे, हि विनंती.

                                                                                                आपला / आपली विश्वासू

                                                                                               (नांव : xxxxxxxxxxxxxx)

(१०० रुपये स्टॅम्प पेपर)

शपथपत्र

कार्यकारी दंडाधिकारी वसई, तालुका वसई, जिल्हा पालघर यांच्यासमोर

मी, श्री.श्रीमती/सौ. xxxxxxxxxxxxxxxxxx, वय वर्षे xx, राहणार xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx महाराष्ट्र, xxxxxxxxxxxx, सत्य प्रतिज्ञेवर लिहून देतो/देते कि, मी सहकार खात्यातील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी, इतर शासकीय विभागातील / स्थानिक स्वराज्य संस्थेतील सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी, सनदी/प्रमाणित लेखा परीक्षक / वकील असून “बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा” चा मेंबर आहे.  माझा नोंदणी क्रमांक एम.एच.-xxxx/xxxx असून, आपणास याद्वारे विनंती करतो कि, आपल्या जिल्ह्यातील  सहकारी संस्थांच्या निवडणूक घेण्याची कार्यवाही वेळोवेळी पार पाडण्यात येते. मी सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी / प्राधिकृत अधिकारी म्हणून काम करणेस इच्छुक असून, मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियम १९६१, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) (सुधारणा) नियम २०१९ व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या तरतुदी ज्ञात आहेत.

मी असेही प्रतिज्ञेवर लिहून देतो की, सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे कामकाज करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व त्याखालील नियम १९६१, महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) नियम २०१४ व महाराष्ट्र सहकारी संस्था (समितीची निवडणूक) (सुधारणा) नियम २०१९ व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या तरतुदीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी / प्राधिकृत अधिकारी म्हणून कामकाज करीन, व सदरचे कामकाज करताना कोणताही प्रकारचा गैरप्रकार व  भेदभाव , कायदा , नियम किंवा निवडणूक नियमावलीचे उल्लंघन करणार नाही. माझ्याकडून सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे कामकाज करताना कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार व भेदभाव, कायदा, नियम किंवा निवडणूक नियमावलीचे उल्लंघन झाल्यास, त्यास मी सर्वस्वी जबाबदार राहीन, व मी कायदेशीर कारवाईस पात्र राहीन.

मी सत्य प्रतिज्ञेवर कथन करतो की, यापूर्वी मी सहकारी संस्थांची निवडणूक घेत असताना / निवडणूक अधिकारी / प्राधिकृत अधिकारी म्हणून कामकाज केलेले नाही त्यामुळे संस्थांची निवडणूक घेत असतांना, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार व भेदभाव, कायदा, नियम किंवा निवडणूक नियमावलीचे उल्लंघन माझ्याकडून झालेले नाही आणि त्याबाबत माझेवर कोणतीही वैधानिक कारवाई करण्यात आलेली नाही.

दिनांक  : xx/12/2024

ठिका  : xxxxxx                                                                                              (नांव : xxxxxxxxxxxxxx)

(किंवा नोटरी करा )

ई प्रवर्गातील सहकारी संस्था म्हणजेच  २५० किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नामतालिकासाठी जोडावी लागणारी आवश्यक कागदपत्रे 

  1. अलीकडचा पासपोर्ट फोटो. (अर्जावर चिटकवा)
  2. निवडणूक प्रशिक्षण प्रमाणपत्र
  3. पदवी प्रमाणपत्र.
  4. वकील असल्यास बार कौन्सिल सर्टिफिकेट.
  5. चार्टर्ड अकाऊंटंट असल्यास चार्टर्ड अकाऊंटंट सर्टिफिकेट.
  6. जी. डी सी. अँड ए. पास असल्यास त्याचे सर्टिफिकेट/मार्कशीट.
  7. आधार कार्ड
  8. पॅन कार्ड
  9. रहिवासी दाखला (लाईट बिल, राशन कार्ड, पासपोर्ट पहिले पण इत्यादी )
  10.  जन्म दाखला (जन्म दाखला, दहावीची सनद, शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र, इत्यादी )

 

अर्ज सादर करावयाचा पत्ता आणि अर्ज सादर करावयाचाशेवटचा दिनांक 

अर्ज सादर करावयाचा पत्ता :-                    विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था,
                                                                  कोकण विभाग, कक्ष क्रमांक ३०८,
                                                                  तिसरा मजला, कोकण भवन,
                                                                  सी.बी.डी. बेलापूर,
                                                                  नवी मुंबई. 

अर्ज सादर करावयाचाशेवटचा दिनांक –  ३१ डिसेंबर २०२४

 

प्रशिक्षण आणि अधिक माहितीसाठी

मुंबई  सर्टिफाइड ऑडिटर असोसिएशन :-                    राहुल पाटील, अध्यक्ष मुंबई        

ठाणे सर्टिफाइड ऑडिटर असोसिएशन :-                       सावकार गुंजाळ, अध्यक्ष ठाणे

नीलिमा वाघमारे
ट्रेनिंग इनचार्ज
ठाणे जिल्हा सर्टिफाइड ऑडिटर्स असोसिएशन ठाणे
9892287259

चारुशीला पाटील
कार्यालय प्रमुख
मुंबई विभाग सर्टिफाइड ऑडिटर्स असोसिएशन.
84509 00536

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *